दृष्टिदोष


दृष्टिदोष /अंशतः अंध /Low vision 


                                      दृष्टिदोषा चे  स्वरूप 

                दिसण्या च्या क्षमतेच्या बऱ्याच अंशी अभाव म्हणजे ' दृष्टीदोष ' हि अवस्था म्हणता येईल . दृष्टी सुधारण्यासाठी चष्मा वापरूनही बऱ्याच प्रमाणात दृष्टी बाधित असेल , तर अशा बालकांचा दृष्टीदोष असलेली बालके म्हणून समावेश करावा लागेल . दृष्टीदोषांचे स्वरूप व तीव्रता बालकानुसार वेगवेगळी असते , म्हणूनच दृष्टीदोष असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या दृष्टीदोषाचा प्रकार व तीव्रतेनुसार अध्यापन -अध्ययन प्रक्रीयेशी व अध्ययन साहित्याशी कदाचित जुळवून घ्यावे लागेल. 
                      दृष्टिदोष, मंददृष्टीत्व  व अंधत्वाच्या व्याख्या  :
  आंतरराष्ट्रीय रोग वर्गीकर (ICD २००६) नुसार " मंददृष्टीत्व ते अंधत्व " या सर्वांचा समावेश  दृष्टीदोषात होतो . म्हणजेच दृष्टीदोष या संज्ञेत  सौम्य व तीव्र मंददृष्टीत्व व अंधत्वाचा समावेश होतो . दृष्टीदोषाविषयी चर्चा करताना दृष्टीतीक्ष्णता व दृष्टीक्षेत्र घटकांचा विचार केला जातो. 
          

                    अगदी साध्या शब्दात , व्यक्ती ठराविक अंतरावरून एखादी वस्तू किती स्पष्टपणे पाहू शकते याचा निर्देशक म्हणजे दृष्टीतीक्ष्णता होय. सामान्यपणे " स्नेलन तक्ता " वापरून याची मोजणी केली जाते . व्यक्तीची प्रमाणित दृष्टीतीक्ष्णता २०/२० ( फुट ) किंवा ६/६  ( मीटर ) असते . एका निश्चित बिंदूकडे पाहत असताना डोळ्याना " दृश्य " म्हणजे " दृष्टीक्षेत्र " होय. 









No comments:

Post a Comment