बुटकेपणा

बुटकेपणा

बुटकेपणा म्हणजे शरिराची उंची कमी असणे यास बुटकेपणा म्हणतात. ४ फुट १० इंच उंचीपेक्षा कमी शारिरीक उंची असणाय्रा प्रौढ व्यक्ति बुटकेपणा किंवा खुजेपणा या व्याख्येत येतात. 

आपल्या शरीरामध्ये स्रवणा-या अनेक संप्रेरकांपैकी एक महत्त्वाचं संप्रेरक आहे ‘ग्रोथ हार्मोन’! ज्याचा आपल्या वाढीवर थेट परिणाम होत असतो. जर हे संप्रेरक कमी प्रमाणात स्रवलं गेलं तर आपली उंची खुंटते आणि बुटकेपण येतो. शिवाय या संप्रेरकाच्या कमी-अधिक स्रवणाच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण करणारी ‘पियुषिका ग्रंथी’ असते. जिच्या कमी-अधिक स्रावानुसार आपली वाढ होणाऱ्या ग्रोथ हार्मोनवर परिणाम होत असतो. थायरॉइड नामक ग्रंरथीचा स्रव वाढीस अनुकूल असून ‘थायरॉइड’ या अंतस्रावाची ग्रंथीवर ‘पियुषिका’ ग्रंथीचं पूर्णत: नियंत्रण असतं. या पियुषिका ग्रंथीच्या स्रावाशी थायरॉइड ग्रंथीचा स्राव असतो. अशा प्रकारची ही अंतस्रावातील हार्मोनची गुंतागुंतीची रचना असते. याचाच परिणाम माणसाच्या उंचीवर होत असतो. म्हणून या स्रवांचा समतोल राखणं हे उंची वाढवण्यासाठी आवश्यक ठरतं. त्या दृष्टीने औषधं दिली जातात.

बुटकेपणाची कारणं कोणती :
अनुवंशिकता : बुटकेपणात अनुवंशिकता हे एक महत्त्वाचं कारण असतं. आईवडील किंवा आजी-आजोबा यापैकी कोणीही बुटकं असलं तरी ते जीन्स भावी पिढीत उतरतात.
कॅल्शियमची कमतरता : आहारातून कमी प्रमाणात जर कॅल्शियम पोटात जात असेल तर वाढ खुंटते.
हॉर्मोन्सचं असंतुलन : आपल्या शरीरात जर पुरेशा प्रमाणात ग्रोथ हार्मोन्स नसतील तर उंची चांगली वाढत नाही.
व्यायामाचा अभाव : रोजच्या जीवनात जर व्यायामाला सवड नसेल तर त्याचा परिणामही काहींच्या वाढीवर होतो.
उपचारातला हलगर्जी : उंची कमी आहे, हे लक्षात येताच जर लहानपणी त्यावर उपाय केला तर त्याचा परिणाम लगेच होतो. जर प्रौढपणी अशा उपचारांना सुरुवात केली तर त्याचा काहीही उपयोग होत नाही.
म्हणूनच तर उंची वाढवण्यासाठी ट्रिटमेंट सुरू करताना आहार, व्यायाम यासंबंधी पूर्ण माहिती घेऊन औषधं सुरू केल्यास नक्कीच उंची वाढते. जेवढय़ा कमी वयात उंचीवर उपचार सुरू केले जातात तितके फायदे आपल्याला लवकर मिळतात.

No comments:

Post a Comment