Learning Disability
अध्ययन अक्षम
अध्ययन अक्षमता अध्ययन अक्षमता म्हणजे काय आपण पाहूया काही मुलांच्या एखाद्या इंद्रियाचा विकास नीट झालेला नसतो ,त्यामुळे मूलभूत कौशल्य विकसित होत असताना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे येतात .आणि विविध कौशल्ये प्राप्त करताना वेगवेगळ्या गरजा निर्माण होतात. काही वेळा वर्गात सर्वांना गोंधळून टाकणारे मुलं आढळून येतात. शारीरिक दृष्ट्या ही मुले चांगले असतात. ऐकणे ,बोलणे ,वागणे यात कोणता दोष आढळून येत नाही .ती मतिमंद पण नसतात. ती सर्वसामान्य मुलांप्रमाणेच असतात .परंतु शालेय शिक्षणात वेगवेगळ्या विषयात वेगवेगळ्या प्रकारे समस्या उद्भवतात आणि शिक्षणात इतर मुलांच्या तुलनेत मागे पडतात .अशा मुलांना अध्ययन क्षमता असलेली किंवा स्लो लर्नर मुले असे म्हटले जाते. त्यांच्या अध्ययनात वेगवेगळे अडथळे येतात ते अडथळे दूर करण्यासाठी विशेष मार्गदर्शनाची गरज पडते.
लवकरात लवकर हे अपंगत्व लक्षात आले तर, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर, या यावर आपण मात करू शकतो. लवकर लक्षात न येणारे अपंगत्व आहे.
सध्याचे युग हे तंत्रज्ञान किंवा स्पर्धेचे युग असून प्रत्येक पालकाला वाटते की आपले मूल इतर मुलांच्या तुलनेत मागे पडू नये .त्यासाठी पालक जागरूक असतात. प्रत्येक पालकाचे दृष्टीने मुलाचे शिक्षण हा विषय खूप महत्त्वाचा असतो. परंतु काही मुलं अभ्यासात मागे पडत असतात .वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर या अध्ययन अक्षम तेवर निश्चीतपणे मार्ग निघु शकतो. वाचन लेखन गणित शुद्धलेखन व्याकरण इत्यादी घटकात किंवा इत्यादी घटक आत्मसात करता येत नाहीत.अध्ययन अक्षम त्याचे साधारणपणे शालेय वयातच लक्षात येते . शाळेत दाखल होईपर्यंत ही मुले सर्वसामान्य मुलांप्रमाणेच दिसतात. परंतु एकदा शाळेत गेले की, त्यांच्या विषयी पालक शिक्षकांकडे तक्रारी घेऊन जातात की आमच्या मुलाला हे येत नाही. किंवा अभ्यासात मागे आहे किंवा अभ्यास करत नाही. पालक लक्ष देत नाही. असे शिक्षक सांगतात . इतर कारणे समोर मांडले जातात . परंतु अध्ययन अक्षमता ओळखता येणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी विशेष शिक्षक यांचे मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे ठरते. परंतु तोपर्यंत महत्वाचा काळ निघून गेलेला असतो. आपण कोणत्या कारणावरून शोधू शकतो की मूल आळशी किंवा निष्काळजी नसून, अध्ययन अक्षम आहे. या मुलांच्या बाबतीत ठराविक लक्षणे दिसून येत नाहीत. . परंतु काही लक्षणावरून आपण अंदाज लावू शकतो.
- कमी आकलन शक्ती असणे
- सर्वसाधारण हालचालींमध्ये समन्वयाचा अभाव असणे
- स्मरणशक्ती विचारशक्ती कमी असणे
- वाचन श्रवण दोष असणे वाचन लेखन व व्याकरण किंवा गणित शुद्धलेखन यातील चुका करणे
- खूप मस्ती करणे
- भावनिक असणे
- एकाग्रतेचा अभाव असणे
- स्मरणशक्ती विचार शक्तीचा अभाव असणे
- वाचवून समजणे अर्थ कळत नाही
- सारखे दिसणारे शब्द चुकीचे वाटत नाही उदाहरणार्थ भरभर भरभर चट चट मट
- वाचलेल्या ओळी परत वाचणे
- गणितातील मूलभूत संबोध बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ,समजणे
- चुकीचे वाचन करणे
- सतत घडलेल्या गोंधळलेल्या वस्तीमध्ये असणे
- चालताना वस्तूवर आदळणे, आपटणे
- ओळखीच्या वातावरणात सुद्धा स्वतःला हरवणे किंवा वर्गात सतत भांडण करणे
- सूचनांचे पालन न करणे
- एक वेळा अनेक गोष्टी न समजणे
- शिक्षकांशी, मित्रांशी सुस्पष्ट न बोलता येणे
- स्वतःचे विचार व्यक्त न करता येणे किंवा अडखळणे
- शरीराच्या वाढीच्या टप्प्यात उशीर
- जन्मानंतरच्या सर्वच क्रिया उशीर होणे पालथे पडणे, रांगणे ,चालणे, बोलणे ,
- अतिशय चंचल
- पटकन सारखे डोळे चोळणे. इ. लक्षणे दिसतात .
मग अशावेळी पालकांनी आपल्या मुलांना समजून घेणे गरजेचे असते. कधीकधी ती घरातल्या व्यक्तींकडून त्या मुलांना त्रास दिला जातो .बावळट मूर्ख तुला काही कळत नाही .अशा प्रकारचे वाक्य त्याला ऐकायला भेटतात त्या विषयातील तज्ञ म्हणजेच विशेष शिक्षकांची भेट घेऊन त्याच्या . समस्या सांगून त्याचे निरीक्षण करून त्यावर पालकांना मार्गदर्शन करणे खूप महत्त्वाचे ठरते किंवा पालकांनी विशेष शिक्षकांची भेट घेऊन ते सगळं ती चर्चा करणे त्यांचे माहिती घेणे हे महत्त्वाचे ठरते . .अध्ययन अक्षम त्यावर काही प्रमाणात मात करता येते.
"ज्या मुलांमध्ये शैक्षणिक अक्षमता असते अशा मुलांमध्ये बहुतेक वेळा त्यांनी दिलेल्या प्रसंगी काय केले आणि त्यांच्याकडून काय त्याप्रसंगी अपेक्षित होते किंवा आहे यात तफावत आढळते ही तफावत एक किंवा अनेक बाबतीत आढळून येते. "---कास आणि मायकेल
अध्ययन अक्षमतेचे तीन प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे
डिसलेक्सिया
वाचनात दोष आढळून येतो . बघून सुद्धा नीट वाचता येत नाही किंवा वाचन करताना शब्द गाळणे किंवा वाढवणे असा दोष दिसून येतो .
डीसग्रफिया
लेखनामध्ये दोषी असतो. शब्द गाळणे किंवा वाढवून घेणे शब्दांची उलटापालट करणे. अशा प्रकारे समस्या असतात.
डिसलेक्सिया
गणितातील दोष गणितातील क्रिया चुकीच्या करणे . गणिताची , अंकाची मांडणी त चुका करणे .उलट-सुलट पद्धतीने मांडणी इत्यादी चुका करतात.
या मुलांना अध्यापनात च्या वेगवेगळ्या पद्धती असतात . विद्यार्थ्यांचे लवकरात लवकर निदान होणे आवश्यक असते. पालकांना समुपदेशन आवश्यक असते. खेळातून शिक्षण मिळणे गरजेचे असते. शिकवण्याच्या गोष्टी वारंवार पुनरावृत्ती करून देणे. लेखनाच्या पूर्वतयारीसाठी हातात पेन्सिल धरायला शिकवणे. एका ओळीत लिहायला शिकविणे . तज्ञाचे साह्याने उपचार करणे गरजेचे ठरते . चित्रांची पुस्तके वापरणे,गोष्टीची पुस्तके वापर करणे, अभ्यास करणे नाट्यीकरण, नाट्य पद्धतीने शिकवणे, शक्य असल्यास संगणकाचा वापर करणे, क इत्यादी
चंचलता आक्रमकता अत्यंत वर्तन समस्या असल्यास मानसउपचार तज्ञ मार्गदर्शन घेणे गरजेचे असते. भाषा शिकवण्यासाठी वाचन शिकवावे छोटे छोटे प्रश्न विचारून पूर्ण वाक्यात उत्तरे देण्यास सांगावे. वारंवार रिपीट करून सांगणे आवश्यक असते .
No comments:
Post a Comment